भारत -एक खोज
भारत- एक खोज त्यादिवशीच्या संध्याकाळी मी पराशर वर काम करत असताना मला वॉट्स अप वर एक मेसेज आला , कर्नाटक मधील मणीपाल विद्यापीठाचा आर्किटेक च्या शेवटच्या वर्षाचा हा विद्यार्थी आपल्या पराशर चा अभ्यास करायला येऊ इच्छित होता. इतर चौकशी करून झाल्यावर 2 दिवसासाठी येण्याचे ठरले आणि तो परवा येऊनही गेला. बेंजामिन ओमेन , वय असेल 21-22 वर्ष , तसा तो केरळचा पण शिकायला कर्नाटकला गेला , त्याचे आईवडील दुबईला असतात , वडील एका मल्टीनेशनल कंपनीत सिनिअर हेड आहेत तर आई शिक्षिका. इकडे गावी चुलते काका असतात. त्याची कौटुंबिक पार्श्वभूमी सांगण्याचे कारण म्हणजे त्याची विचारप्रक्रिया आणि कामाची पद्धत. बेन्जामिनला रेखाटनाची आवड म्हणून तर भाऊने येतानाच्या प्रवासातील त्याच्या बाजूला बसलेल्या माणसाचे , बस मधील कंडक्टरचे स्केच काढले होते. त्याच्या वयाची किंवा त्याच्या सोबतची पोरं कुठं तरी मजामस्ती करण्यात गुंग असताना, हा त्याच्या आवडीच्या गोष्टीचा अभ्यास करायला इतक्या लांब आला होता, याचेच मला जास्त कौतुक वाटत होते. त्याने, त्याच्या प्रकल्पासाठी कृषी पर्यटन हा विषय निवडला आहे , मग अभ्यास दौऱ्यासाठी इतर...