शाळेच्या गेटसमोरील पिवळ्या फुलांचे झाड
शाळेच्या गेटसमोरील पिवळ्या फुलांचे झाड त्या शाळेच्या गेटसमोर, पिवळ्या फुलांचं मोठ्ठ झाड आहे. शाळेची इमारत बांधून झाल्यावर उद्घाटनाच्या वेळी , प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते केलेल्या वृक्षारोपणात, हे झाड लावलं होतं. इतक्या वर्षात किती छान वाढलंय. मजबूत खोड झालंय , फांद्याचा पसारा वाढलाय, त्याला छान पिवळी फुलं येऊ लागली. तशी त्याची पिवळी धमक फुलं कमी अधिक प्रमाणात वर्षभर दिसत असतात. रोज काही फुलं खाली रस्त्यावर , शाळेच्या गेट समोर पडतात. त्याच पिवळ्या फुलांवरून, शाळेच्या मुलांना घेऊन येणाऱ्या पिवळ्या बस गेटच्या आत येत असतात. शाळाही इतक्या दिवसांत छान वाढलीय. आधी फारच कमी मुलं होती. आता हजाराच्या वर मुलांची संख्या झालीय. शाळेचं उद्घाटन झालं तेव्हा अजिबात झाडं नव्हती , म्हणून चांगली मोठी झाडं लावली होती. शाळेच्या इमारती एवढ्या उंचीची झाडे होती ती. शाळेचा प्रत्येक मजला जसा वाढत गेला , तशीच झाडानेही शाळेच्या उंचीची बरोबरी केली. एका कालावधी नंतर शाळेच्या इमारतीचे मजले चढायचे थांबले. झाड मात्र जमिनीच्या खाली आणि आकाशभर वाढतच राहिलं. खोड मजबूत झालं , फाद्यांचा पसारा वाढला. आता...