Posts

Showing posts from December, 2025

आपण सगळेच कलाकार

Image
  आपलं काम जेव्हा आपण जीव ओतून करतो..एका समर्पित भावनेने करतो तेव्हा फक्त काम पूर्ण होत नाही..तर ती बनते कलाकृती. आणि ती कलाकृती साकारणारा आपसूकपणे बनतो ...कलाकार. घाईगडबडीत केवळ उरकायचं आहे म्हणून आणि अप्लाइड व्हॅल्यू आला म्हणजे बास एवढंच फक्त जगणं असतं..तर आयुष्यात अईस्थेटिक व्हॅल्यू ची उणीव भासलीच नसती.  अप्लाइड अप्रोच जगण्याचे, व्यावहारिक प्रश्न सोडवतो. तर अईस्थेटिक अप्रोच जगण्याला आनंदी, सुगंधी आणि अर्थपुर्ण बनवतो. जगण्यात हे दोन्ही अप्रोच गरजेचे आहेत.  आपल्या पराशर कृषी व संस्कृती पर्यटन, राजुरी इथल्या ग्रामीण वस्तु संग्रहालयात जेव्हा ही वस्तू आली तेव्हा ती साफ करताना, बराच वेळ न्याहाळत होतो. यातील कलाकुसर, बारकावे, शेतकरी, तो पेरणी करतोय ती पाभार, त्याच्या मागे असणारी त्याची बायको, तिच्या हातातील मोघं, चाड्याच्या गळ्याचे नक्षीकाम आणि पेरणीची गोष्ट... सगळंच फार ग्रेसफुल आणि कलात्मक आहे. हे ज्या सुताराने साकारले असेल, आणि ज्या शेतकऱ्याने हौसेने विकत आणले असेल ; त्या दोघांची मानसिकता किती कलासक्त असेल नाही? आजच्या, मला वेळ नाही, मी खूप बीजी आहे अशा मानसिक स्थैर्याचा अ...

बुक फेस्टिवल पुणेः २०२५

Image
  अनेक प्रवास...अनेक वेदना...अनेक आनंद...अनेक दृष्टिकोन...अनेक अनुभव...अनेक गोष्टी...अनेक प्रवास... इथं जमा झालेत.  जगाच्या कानाकोपऱ्यातील लेखकांनी, शब्दबद्ध केलेल्या  त्यांच्या गोष्टी, नटून थटून जमा झाल्यात. नुसत्या जमा नाही झाल्यात तर त्याही मोठ्या उत्साहाने सजून सहभागी झाल्यात, अनेक रंग...अनेक लिपी...अनेक भाषा...अनेक आकार...अनेक बांधणी आणि अनेक फील घेऊन. नव्या कोऱ्या पानांचा ताजा सुगंध...ताज्या बायडिंगचा नवाकोरा स्पर्श...स्वतःला नीटनेटकं प्रेजेंटेबल बनवत, उभी राहिलेली पुस्तकांची आरास, पुणे बुक फेस्टिवल -२०२५ ला अजून सुशोभित करतेय. इथं पुस्तकांच्या गाठीभेटी होतात, भाषांची एकत्र ऊठबस होते. प्रकाशकांच्या पालकत्वाने आणि वितरकांच्या बोलाचालीत पुस्तकांच्या, वाचकांसोबत  सोयरिकी घडताना दिसतात. फायनल बिल करून, पुस्तकं पिशवीत भरून देताना; मुलीची बोळवण केल्यासारखं, दिल्या घरी सुखी रहा म्हणत प्रकाशक/वितरक; पुस्तकं, वाचकांच्या हाती सोपवत असतात. वाचक, त्या पुस्तकाला, आधीच गर्दी असलेल्या आयुष्यात थोडी जागा करून देतो आणि पुढे चालू लागतो. ..आणि पुस्तक? इतका वेळ टेबलवर/रॅकमधे इतर प...