आपण सगळेच कलाकार

 


आपलं काम जेव्हा आपण जीव ओतून करतो..एका समर्पित भावनेने करतो तेव्हा फक्त काम पूर्ण होत नाही..तर ती बनते कलाकृती. आणि ती कलाकृती साकारणारा आपसूकपणे बनतो ...कलाकार.


घाईगडबडीत केवळ उरकायचं आहे म्हणून आणि अप्लाइड व्हॅल्यू आला म्हणजे बास एवढंच फक्त जगणं असतं..तर आयुष्यात अईस्थेटिक व्हॅल्यू ची उणीव भासलीच नसती. 


अप्लाइड अप्रोच जगण्याचे, व्यावहारिक प्रश्न सोडवतो. तर अईस्थेटिक अप्रोच जगण्याला आनंदी, सुगंधी आणि अर्थपुर्ण बनवतो. जगण्यात हे दोन्ही अप्रोच गरजेचे आहेत. 


आपल्या पराशर कृषी व संस्कृती पर्यटन, राजुरी इथल्या ग्रामीण वस्तु संग्रहालयात जेव्हा ही वस्तू आली तेव्हा ती साफ करताना, बराच वेळ न्याहाळत होतो.


यातील कलाकुसर, बारकावे, शेतकरी, तो पेरणी करतोय ती पाभार, त्याच्या मागे असणारी त्याची बायको, तिच्या हातातील मोघं, चाड्याच्या गळ्याचे नक्षीकाम आणि पेरणीची गोष्ट... सगळंच फार ग्रेसफुल आणि कलात्मक आहे.


हे ज्या सुताराने साकारले असेल, आणि ज्या शेतकऱ्याने हौसेने विकत आणले असेल ; त्या दोघांची मानसिकता किती कलासक्त असेल नाही?


आजच्या, मला वेळ नाही, मी खूप बीजी आहे अशा मानसिक स्थैर्याचा अभाव असणाऱ्या काळात; पराशर च्या ग्रामीण वस्तु संग्रहालयातील "अशा" अनेक कलाकृतींना घेऊन संवाद होतात. पाहुणे मंडळी मोकळी होतात, अंतर्मुख होतात आणि मुख्य म्हणजे प्रोत्साहित होतात. कशासाठी? आतला "कलाकार" जागा करण्यासाठी.


पराशर कृषी व संस्कृती पर्यटन, राजुरी (जुन्नर)

७०३८८९०५००

९९७०५१५४३८

www.parasharagritourism.com

Comments

Popular posts from this blog

शाळेच्या गेटसमोरील पिवळ्या फुलांचे झाड

बुक फेस्टिवल पुणेः २०२५