Posts

आपण सगळेच कलाकार

Image
  आपलं काम जेव्हा आपण जीव ओतून करतो..एका समर्पित भावनेने करतो तेव्हा फक्त काम पूर्ण होत नाही..तर ती बनते कलाकृती. आणि ती कलाकृती साकारणारा आपसूकपणे बनतो ...कलाकार. घाईगडबडीत केवळ उरकायचं आहे म्हणून आणि अप्लाइड व्हॅल्यू आला म्हणजे बास एवढंच फक्त जगणं असतं..तर आयुष्यात अईस्थेटिक व्हॅल्यू ची उणीव भासलीच नसती.  अप्लाइड अप्रोच जगण्याचे, व्यावहारिक प्रश्न सोडवतो. तर अईस्थेटिक अप्रोच जगण्याला आनंदी, सुगंधी आणि अर्थपुर्ण बनवतो. जगण्यात हे दोन्ही अप्रोच गरजेचे आहेत.  आपल्या पराशर कृषी व संस्कृती पर्यटन, राजुरी इथल्या ग्रामीण वस्तु संग्रहालयात जेव्हा ही वस्तू आली तेव्हा ती साफ करताना, बराच वेळ न्याहाळत होतो. यातील कलाकुसर, बारकावे, शेतकरी, तो पेरणी करतोय ती पाभार, त्याच्या मागे असणारी त्याची बायको, तिच्या हातातील मोघं, चाड्याच्या गळ्याचे नक्षीकाम आणि पेरणीची गोष्ट... सगळंच फार ग्रेसफुल आणि कलात्मक आहे. हे ज्या सुताराने साकारले असेल, आणि ज्या शेतकऱ्याने हौसेने विकत आणले असेल ; त्या दोघांची मानसिकता किती कलासक्त असेल नाही? आजच्या, मला वेळ नाही, मी खूप बीजी आहे अशा मानसिक स्थैर्याचा अ...

बुक फेस्टिवल पुणेः २०२५

Image
  अनेक प्रवास...अनेक वेदना...अनेक आनंद...अनेक दृष्टिकोन...अनेक अनुभव...अनेक गोष्टी...अनेक प्रवास... इथं जमा झालेत.  जगाच्या कानाकोपऱ्यातील लेखकांनी, शब्दबद्ध केलेल्या  त्यांच्या गोष्टी, नटून थटून जमा झाल्यात. नुसत्या जमा नाही झाल्यात तर त्याही मोठ्या उत्साहाने सजून सहभागी झाल्यात, अनेक रंग...अनेक लिपी...अनेक भाषा...अनेक आकार...अनेक बांधणी आणि अनेक फील घेऊन. नव्या कोऱ्या पानांचा ताजा सुगंध...ताज्या बायडिंगचा नवाकोरा स्पर्श...स्वतःला नीटनेटकं प्रेजेंटेबल बनवत, उभी राहिलेली पुस्तकांची आरास, पुणे बुक फेस्टिवल -२०२५ ला अजून सुशोभित करतेय. इथं पुस्तकांच्या गाठीभेटी होतात, भाषांची एकत्र ऊठबस होते. प्रकाशकांच्या पालकत्वाने आणि वितरकांच्या बोलाचालीत पुस्तकांच्या, वाचकांसोबत  सोयरिकी घडताना दिसतात. फायनल बिल करून, पुस्तकं पिशवीत भरून देताना; मुलीची बोळवण केल्यासारखं, दिल्या घरी सुखी रहा म्हणत प्रकाशक/वितरक; पुस्तकं, वाचकांच्या हाती सोपवत असतात. वाचक, त्या पुस्तकाला, आधीच गर्दी असलेल्या आयुष्यात थोडी जागा करून देतो आणि पुढे चालू लागतो. ..आणि पुस्तक? इतका वेळ टेबलवर/रॅकमधे इतर प...

शाळेच्या गेटसमोरील पिवळ्या फुलांचे झाड

Image
  शाळेच्या गेटसमोरील पिवळ्या फुलांचे झाड  त्या शाळेच्या गेटसमोर, पिवळ्या फुलांचं मोठ्ठ झाड आहे. शाळेची इमारत बांधून झाल्यावर उद्घाटनाच्या वेळी , प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते केलेल्या वृक्षारोपणात, हे झाड लावलं होतं. इतक्या वर्षात किती छान वाढलंय. मजबूत खोड झालंय , फांद्याचा पसारा वाढलाय, त्याला छान पिवळी फुलं येऊ लागली. तशी त्याची पिवळी धमक फुलं कमी अधिक प्रमाणात वर्षभर दिसत असतात. रोज काही फुलं खाली रस्त्यावर , शाळेच्या गेट समोर पडतात. त्याच पिवळ्या फुलांवरून, शाळेच्या मुलांना घेऊन येणाऱ्या पिवळ्या बस गेटच्या आत येत असतात. शाळाही इतक्या दिवसांत छान वाढलीय. आधी फारच कमी मुलं होती. आता हजाराच्या वर मुलांची संख्या झालीय. शाळेचं उद्घाटन झालं तेव्हा अजिबात झाडं नव्हती , म्हणून चांगली मोठी झाडं लावली होती. शाळेच्या इमारती एवढ्या उंचीची झाडे होती ती. शाळेचा प्रत्येक मजला जसा वाढत गेला , तशीच झाडानेही शाळेच्या उंचीची बरोबरी केली. एका कालावधी नंतर शाळेच्या इमारतीचे मजले चढायचे थांबले. झाड मात्र जमिनीच्या खाली आणि आकाशभर वाढतच राहिलं. खोड मजबूत झालं , फाद्यांचा पसारा वाढला. आता...

भारत -एक खोज

Image
भारत- एक खोज  त्यादिवशीच्या संध्याकाळी मी पराशर वर काम करत असताना मला वॉट्स अप वर एक मेसेज आला , कर्नाटक मधील मणीपाल विद्यापीठाचा आर्किटेक च्या शेवटच्या वर्षाचा हा विद्यार्थी   आपल्या पराशर चा अभ्यास करायला येऊ इच्छित होता. इतर चौकशी करून झाल्यावर 2 दिवसासाठी येण्याचे ठरले आणि तो परवा येऊनही गेला. बेंजामिन ओमेन , वय असेल 21-22 वर्ष , तसा तो केरळचा पण शिकायला कर्नाटकला गेला , त्याचे आईवडील दुबईला असतात , वडील एका मल्टीनेशनल कंपनीत सिनिअर हेड आहेत तर आई शिक्षिका. इकडे गावी चुलते काका असतात. त्याची कौटुंबिक पार्श्वभूमी सांगण्याचे कारण म्हणजे त्याची विचारप्रक्रिया आणि कामाची पद्धत. बेन्जामिनला रेखाटनाची आवड म्हणून तर भाऊने येतानाच्या प्रवासातील त्याच्या बाजूला बसलेल्या माणसाचे , बस मधील कंडक्टरचे स्केच काढले होते. त्याच्या वयाची किंवा त्याच्या सोबतची पोरं कुठं तरी मजामस्ती करण्यात गुंग असताना, हा त्याच्या आवडीच्या गोष्टीचा अभ्यास करायला इतक्या लांब आला होता, याचेच मला जास्त कौतुक वाटत होते. त्याने, त्याच्या प्रकल्पासाठी कृषी पर्यटन हा विषय निवडला आहे , मग अभ्यास दौऱ्यासाठी इतर...